मराठी भाषेतील वाक्प्रचार हे भाषेला अधिक प्रभावी, ओजस्वी आणि भावपूर्ण बनवतात. शालेय अभ्यासक्रमात वाक्प्रचारांचा अभ्यास केल्याने विद्यार्थ्या...
मराठी भाषेतील वाक्प्रचार हे भाषेला अधिक प्रभावी, ओजस्वी आणि भावपूर्ण बनवतात. शालेय अभ्यासक्रमात वाक्प्रचारांचा अभ्यास केल्याने विद्यार्थ्यांची भाषिक अभिव्यक्ती समृद्ध होते.
इयत्ता नववी (९ वी) कुमारभारती मराठी पाठ्यपुस्तकात दिलेले वाक्प्रचार व त्यांचा वाक्यातील उपयोग पुढीलप्रमाणे आहे :
✅ ✍️ वाक्प्रचारांचे अर्थ व वाक्यातील उपयोग
निंदा करणे – दोष सांगणे / टीका करणे
👉 विनाकारण इतरांची निंदा करणे हा चांगला स्वभाव नाही.-
स्तुती करणे – गुणगान करणे
👉 परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या स्मिताची शिक्षकांनी स्तुती केली. -
जवळीक साधणे – मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे
👉 नवीन शाळेत गेल्यावर राजूने सर्वांशी पटकन जवळीक साधली. -
तारेवरची कसरत करणे – अतिशय अवघड काम करणे
👉 स्रियांना एकाच वेळी घर आणि नोकरी सांभाळताना तारेवरची कसरतच करावी लागते. -
जिवाची उलघाल होणे – मन बेचैन होणे
👉 जसजशी परीक्षेच्या निकालाची तारीख जवळ येत होती तसतशी वेदांतची जिवाची उलघाल होत होती. -
कानमंत्र देणे – गुपित सांगणे / सूचना देणे
👉 मित्राने त्याला यशस्वी होण्यासाठी काही कानमंत्र दिले. -
कात टाकणे – स्वभाव बदलणे / सुधारणा होणे, जुन्या गोष्टींचा त्याग करून पूर्णपणे नवीन स्वरूप धारण करणे.
👉 चुकीनंतर त्याने कात टाकून नवे जीवन सुरू केले.
-
उंबरठा ओलांडणे – घरात / ठिकाणी प्रवेश करणे
👉 लग्नानंतर वधूने नवऱ्याच्या घराचा उंबरठा ओलांडला. -
पिकलं पान गळणं – मृत्यू येणे
👉 आजोबांचं पिकलं पान गळलं आणि सारा परिवार दुःखी झाला. -
नवी पालवी फुटणे – नवीन सुरुवात होणे
👉 उन्हाळ्यानंतर झाडाला नवी पालवी फुटली. -
कपाळावरील कुंकू पुसले जाणे – पतीचा मृत्यू होणे
👉 तिच्या कपाळावरील कुंकू पुसले तेव्हा सर्वजण शोकाकुल झाले. -
डोळ्यांतले अश्रू पुसणे – दुःख दूर करणे
👉 मुलाने यश मिळवून आईचे डोळ्यांतले अश्रू पुसले. -
भविष्याचा वेध घेणे – पुढील परिस्थितीचा अंदाज घेणे
👉 शास्त्रज्ञ निसर्गाचा अभ्यास करून भविष्याचा वेध घेतात. -
घाम गाळणे – कष्ट करणे
👉 शेतकरी शेतात दिवसरात्र घाम गाळतो. -
कृतकृत्य होणे – पूर्ण समाधान मिळणे
👉 गुरूंनी आशीर्वाद दिल्यावर तो कृतकृत्य झाला. -
चार पैसे गाठीला बांधणे – थोडी बचत करणे
👉रामूने आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मोठ्या कष्टाने चार पैसे गाठीला बांधले. -
बेगमी करणे – आवश्यक साठा करणे
👉 आईने हिवाळ्यासाठी धान्याची बेगमी केली. -
भ्रांत असणे – विवंचना / संभ्रमात असणे
👉 त्याला कोणते पुस्तक घ्यावे याबाबत भ्रांत होती. -
ताव मारणे – भरपूर खाणे, पोटभर खाणे.
👉 गरमागरम पोळ्यांवर सगळ्यांनी ताव मारला. -
धूम ठोकणे – पळून जाणे.
👉 पोलिसांना पाहताच चोरांनी गावातून धूम ठोकली. -
आव्हान स्वीकारणे – धाडसाने कठीण काम अंगावर घेणे
👉 खेळाडूने आव्हान स्वीकारून विजेतेपद मिळवले. -
रौद्ररूप धारण करणे – भीतिदायक स्थिती निर्माण होणे.
👉 अन्याय सहन न झाल्यामुळे जनता रौद्ररूप धारण केले. -
हद्दपार होणे – गावातून / समाजातून बाहेर टाकले जाणे
👉 गुन्हेगाराला गावातून हद्दपार करण्यात आले. -
दुरावत जाणे – लांब जाणे.
👉 राम आणि श्याम यांच्यातील गैरसमजांमुळे दोघेही दुरावत गेले. -
दंग असणे – एखाद्या गोष्टीत तल्लीन होणे
👉 रविवारचा दिवस असल्याने मुले खेळण्यात दंग होती. -
विरून जाणे – नाहीसे होणे / कमी होणे
👉संजयचे वडील गेल्याचे दुःख जसजसे दिवस सरले तसे विरून गेले.
📌 अभ्यासासाठी टिप :
-
वाक्प्रचार नेहमी निश्चित स्वरूपात वापरावेत.
-
योग्य संदर्भात वापरल्यास लेखन व बोलण्यात सौंदर्य वाढते.
-
परीक्षेत दिलेल्या वाक्प्रचारांचे अर्थ व उदाहरणे लक्षात ठेवणे सोपे जाते.
🎯 निष्कर्ष
इयत्ता नववी मराठी कुमारभारती पाठ्यपुस्तकातील वाक्प्रचार विद्यार्थ्यांना समृद्ध भाषिक अभिव्यक्ती शिकवतात. या वाक्प्रचारांचा सराव करून विद्यार्थी निबंध, पत्र, कथालेखन तसेच परीक्षेतील उत्तरांमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतात.

.gif)

COMMENTS